top of page

Rockstar

म्हणतात ना..मोठं व्हायचयं? काहीतरी बनायचयं? स्वप्न पहा.. भरपूर स्वप्न पहा.. त्यांनी झपाटून जा…ध्यास घ्या त्यांचा..तुमच्या प्रत्येक श्वासात त्याचे भारलेपण जाणवू द्या..मग नक्की, अगदी नक्की यश मिळालचं म्हणून समजा..अशाच एका ध्यासाची आणि थोड्याशा भरकटलेल्या भारलेपणाची कथा म्हणजे रणबीर कपूरचा नवा चित्रपट रॉकस्टार….


अगदी प्रथमदर्शनी frame पासून खिळवून ठेवणारा… तसं पाहिलं तर कथेत फारसं नावीन्य किंवा फारसं वेगळेपण नक्कीच नाही..पण चित्रपट पहाताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवत रहाते आणि ती म्हणजे प्रेक्षकांना काहीतरी चांगलं देण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न..फक्त तिकीट खिडकीवर लक्ष न ठेवता एक चांगला चित्रपट बनवण्याचा केलेला अतिशय प्रामाणिक प्रयास… दिग्दर्शक, अभिनेते, संगीतकार अगदी सगळ्या सगळ्यांचे अतिशय मनापासून केलेले काम जाणवत रहाते..

कथा साधीशीच.. सुखवस्तू कुटूंबातला एक मुलगा, जनार्दन जाखड.. आयुष्यात rockstar होण्याच्या ध्येयाने पछाडलेला..पण नक्की कसा करायचा हा प्रवास याबद्दल कमालीचा गोंधळलेला.. तुझ्या आयुष्यात दुःखच नाही त्यामुळे तुझी कला बहरत नाहीये.. असल्या कसल्याशा सल्लावर विचार करून करून थकलेला..आणि मग प्रेमभंग हेच एकमेव दुःखाचं कारण होवू शकतं हा साक्षात्कार झाल्यावर, त्याच्या आयुष्यात नकळत आलेली हीर, एक स्वछंदी मुलगी, त्या पाठोपाठ या जनार्दन जाखडचा झालेला J.J. , त्याचा यशाच्या दिशेने झालेला प्रवास, आणि मिळालेली प्रसिद्धी पचवता न आल्याने एकीकडे टोकाची लोकप्रियता आणि दुसरीकडे अतिशय कोलाहलाने भरलेले मन, परिणामी डागाळलेली प्रतिमा ..यांचं अविरहत चाललेलं द्वंद्व..

एक अतिशय mature दिग्दर्शनाचा आणि तितक्याच ताकदीच्या अभिनयाचा उत्तम नमुना आहे Rockstar.. इम्तियाज अलीचा ठसा चित्रपटाच्या हर एका प्रसंगामध्ये जाणवत रहातो.. आजपर्यंत बर्‍याच हिंदी चित्रपटात एक विशिष्ट कथा असते आणि हर एकवेळी तिचा एक विशिष्ट शेवट घडणे अपेक्षित असते, म्हणजे जर प्रेमाचा त्रिकोण–बिकोण दाखवायचा असेल तर, एकाला प्रेम मिळणे, आणि दुसर्‍याने त्याग करणॆ किंवा सरळ सरळ मरणे असे काहीसे अपेक्षित असते… पण इथे कथा साचेबद्ध होत नाही.. तर एक प्रवास बनते.. यात एक ठराविक शेवट नाही.. हिरो/हिरोईनचे एकत्र येणे नाही, प्रत्यक्ष मरणं पण नाही.. नायकाचं वर्तन/प्रतिमा पूर्णपणे बदलून त्याचं संत होणं असलं काही नाही.. किंबहुना..पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट असं काही नसतं याची ग्वाही मात्र नक्की आहे..

संगीताबद्दल काय बोलणार.. रेहमान ही एक जादू आहे.. भुरळ पडणारच…. पण अगदी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो…. ” फाया कुम ” या गाण्याचा..एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो रेहमान आपल्याला… खरचं रेहमान हे एक अजब रसायन आहे.. इतकं भिडणार संगीत हा दर एका चित्रपटात कसा काय बुवा देवू शकतो… मोहित चौहानसुद्धा अप्रतिम… अतिशय सच्चा सूर जाणवत रहातो याच्या आवाजातून…


पण खरी कमाल केलीय ती.. रणबीर कपूरने.. अप्रतिम अभिनय.. सुरवातीचा काहीसा बुजरा, घाबरट, गोंधळलेला रणबीर, हीरबरोबर धमाल करणार, उत्फ्फुल रणबीर, त्याच्याही नकळत हीर मधे गुंतत जाणारा.. घरातल्यांनी घराबाहेर काढल्यावर दर्ग्यात रहाताना खर्‍याअर्थाने संगीताचा, गाण्याचा साक्षात्कार झालेला रणबीर, यशस्वी, मनस्वी, आणि तरीही हळवा रणबीर..अप्रतिम..केवळ अप्रतिम.. Rockstar चं attitude, त्याचं वागणं, बोलणं अगदी नैसर्गिक..

हीर आपल्यामुळे कोमात जातेय हे कळल्यावर त्याची झालेली तगमग, आणि अगदी त्याचं वेळी पोलिसांनी त्याला केलेली अडवणूक, या सगळ्याने सैरभैर झालेला J.J. असा काही वठवलाय त्याने, की हा केवळ ३–४ वर्षे आहे या फिल्मी दुनियेत यावर विश्वासच बसत नाही…

फारसा वेगळा नसूनही वेगळा वाटणारा हा Rockstar अगदी must watch….

16 views0 comments

Recent Posts

See All

खिडकी

प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी...

निरगाठ..

एक एक धागा नकळत उलगडत जातोय…ईकडून तिकडे.. एक एक वीण जुळवण्यासाठी.. कधी प्रवाहाबरोबर..कधी प्रवाहाविरुद्ध.. कधी त्याच्यासारख्या इतर...

Kommentare


bottom of page