Madhura
काय मस्त वाटतंय…
आज असेच खूप साऱ्या दिवसांनी काही तरी लिहावेसे वाटले… काल मी गेले होते माझ्या जुन्या ऑफिसला काही कामासाठी…. पण, अचानक इतके काही जुने सापडल्यासारखे झाले .. जणू, आपला जुना कप्पा आवरताना इतके काही सापडावे.. जुने छोटीशी बाहुली , जपून ठेवलेली काचेची बांगडी, फुटकाआरसा.. आणि मग ते आवरता आवरता इतकी धांदल उडवी कि काय आवारात होतो तेच समजेनासे व्हावे… माझे मलाच काल नव्याने कळले , कि किती attached होते मी त्या ऑफिसला कदचोइत पहिली नोकरी, त्यात पहिले ऑफिस आणि पहिला प्रोजेक्ट म्हणून हि असेल कदाचित …. तिथली हिरवीगार पसरलेली बाग, काल मला अधिकच सुंदर वाटली… प्रोजेक्टच्या कामातून मी आणि माझ्या मैत्रिणीने घेतलेले कॉफी ब्रेक , दुपारच्या जेवणात , जेवणाबरोबरच तितक्याच चवीने चघळंलेले विषय.. न संपणाऱ्या गप्पा ..नवीन जुळणारे भावबंध… सगळेच आठवून एकदम भूतकाळात गेल्या सारखे वाटले… एकदम छान 🙂 🙂 🙂
