top of page
Writer's pictureMadhura

असं होतं का हो कधी तुमचं ???

असं होतं का हो कधी तुमचं?? एक अनामिक अस्वस्थतेची लहर नव्हे नव्हे लाटचं येते उभ्या जगण्यावर…खरं तरं खूप छान चाललेलं असतं सगळं..

चांगली (की गलेलठ्ठ म्हणू) नोकरी, उत्तम घर, कदाचित गाडी इत्यादी इत्यादी … यापेक्षा सुंदर काय असणार असं सगळ्यांना वाटतं असतं तरीही एखादं मन मात्र

अस्वस्थ असतं या सर्वात असुनंही काही तरी शोधतं असतं …एक प्रकारची अस्वस्थता असते..शिथिलता..पण ही येतेय का आणि कुठुन याचा काही शोध लागता लागतं नाही….

माझं ही असचं झालयं असं थोडसं…म्हणुन म्हटलं जरा तुम्हालाही विचारुया तुमचं ही होतं का हो असं???

कदाचित रोजचा दिवस अगदी कालच्या सारखाच उगवतोयं याची खंत सतावतेय..नवीन अनुभव, नवीन आव्हानं हवीयतं ती सापडतं नाहियेत..

पण, खरं सांगू..या सगळ्यातून मरगळ आली असेल कदाचित पण निराशा नक्कीच नाही..

कारण, कुठे तरी जाणवतयं की या अस्वस्थतेतूनच एक नवा ध्यास सपडणार आहे..जोवर ही अस्वस्थता आहे ना..तोवर त्यातून बाहेर पडण्याची जिद्द काम करणारच..

खरी भिती असते ती निश्क्रिय मनाची..त्यापेक्षा ही अस्वस्थता किती तरी चांगली…

यातूनच मग एक नवा सूर सापडेलं..एखादी सुंदर तान आख्खं जगणंच एक मैफ़िल करून टाकेल..

ज्याची त्याची ही तान भिन्न .. कुणाचि गप्पांच्या फ़डात, कुणाचि पहाटेच्या दवबिंदूना झेलतं फ़िरण्यातं, कुणाचि पुस्तकातल्या मौक्तिकात आणि कुणाचि टापटीप घरातं..

ती शोधायला हवी असं वाटणंच तिच्या पर्यंत पोचण्याचं पहिलं पाऊलं नव्हे काय??

जर स्वप्नं पाहिलचं नाही तरं ते पूर्ण करायची आसं कशी काय लागणार ? आणि आसचं नाही लागली तर ते स्वप्न ध्यास बनून प्रत्यक्षात उतरणार तरी कसे?

म्हणून ना, खूप खूप स्वप्न बघावित,उराशी बाळगावी आणि ध्यास घेऊन सत्यात ही उतरवावित…

पण, मला ना जरा जास्तचं स्वप्न पडतात.. आणि त्यातल्या कुणाचा ध्यास घ्यायचा तेच कळेनासे होते कधी कधी..

म्हणजे ना.. कधी कधी (किंवा रोजचं म्हणा ना) खूप खूप वाचवे..नवं नवं लिहावं काहितरी, अगदी मनाच्या स्पंदनांइतकं नितळं आणि प्रामाणिक..

कधी वाटतं, रंगांच्या दुनियेत चित्रांना नव्याने समजून घ्यावे..

घराचे घरपणं मनसोक्त अनुभवावे..

नवीन नवीन (अर्थात चविष्ट आणि रुचकर) पदार्थ करावेत आणि खाऊ घलावेत..

बाग फुलवावी…इत्यादी इत्यादी ….

अरे बापरे.. फ़ार जास्त पर्याय झाले ना..

कदाचित सगळे नाही जमणार एकावेळी.. पण यातला एखादा पर्याय बनून ही जाईल माझी तान..

पण त्याचा शोध मात्र घेतला पाहिजे मला, अगदी मनापसून.. सगळा आळस, शिथिलता झटकून.. आणि अगदी या क्षणापासून……

0 views0 comments

Recent Posts

See All

खिडकी

प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी...

निरगाठ..

एक एक धागा नकळत उलगडत जातोय…ईकडून तिकडे.. एक एक वीण जुळवण्यासाठी.. कधी प्रवाहाबरोबर..कधी प्रवाहाविरुद्ध.. कधी त्याच्यासारख्या इतर...

Comments


bottom of page